शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल विजय पवार यांना ‘आदर्श अधिकारी रत्न-२०२६’ पुरस्काराने सन्मानित

जळगाव प्रतिनिधी :
शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत शैक्षणिक विकासाला चालना देणारे पंचायत समिती जळगाव येथील शिक्षण विस्तार अधिकारी, ग. स. सोसायटी संचालक तथा पाचोरा तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार यांना जिनियस मास्टर्स फाउंडेशन, जामनेर यांच्यातर्फे राज्यस्तरीय ‘आदर्श अधिकारी रत्न-२०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमात विधान परिषद आमदार श्री. नंदकिशोर महाजन, जामनेर नगराध्यक्षा सौ. साधना ताई महाजन आणि श्री. अमर भाऊ पाटील यांच्या शुभहस्ते विजय पवार यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व पदक प्रदान करून सपत्नीक गौरविण्यात आले.
यावेळी गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण, प्रशासन अधिकारी खलील शेख, अधीक्षक संजय पाटील, जिनियस फाउंडेशनचे अध्यक्ष रमेश पाटील, सचिव नामदेव पाटोळे, ग. स. अध्यक्षा सौ. रागिणी चव्हाण, ग. स. संचालक महेश पाटील, योगेश इंगळे, अजय सोमवंशी, विविध पतसंस्थांचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातून आलेले शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांची घेतली दखल
विजय पवार हे शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी विविध गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, शिक्षण क्षेत्रातून विजय पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...