उपक्रमशील विजय लुल्हे " संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित*

जळगांव प्रतिनिधी
विजय लुल्हे यांना कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी ( कबचौ. उमवि. , जळगाव ) यांच्या शुभहस्ते " संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ " प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी जळगाव येथील संजीवन जेष्ठ नागरिक मंडळातर्फे समाजकार्य आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन विजय लुल्हे यांचा गौरव करण्यात आला. सूर्यजीवनी अभ्यासिका जळगाव येथे संपन्न झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे उपाध्यक्ष सुनील जाधव असून विचारपिठावर सचिव प्रकाश बारी, सहखजिनदार उल्हास चौधरी,जनसंपर्क अधिकारी कैलास सोनार मान्यवर उपस्थित होते.
*वाचन चळवळ / ग्रंथदान : -* विजय लुल्हे वाचन चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी अविरत कार्यरत असतात. पूज्य साने गुरुजी मोफत वाचनालय व ग्रंथालय किनगाव बुद्रुक तालुका यावल वाचनालयाचे ते संस्थापक कार्याध्यक्ष आहेत. किनगाव ग्रामीण परिसरात ' रसिकवेद वाचक मंडळ ' स्थापन करून ५० रुपयात ५० दर्जेदार दिवाळी अंक साकळी पद्धतीने उपलब्ध करून दिले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाध्यक्ष असून चार तालुक्यात त्यांच्या शाखा आहेत. लोकसहभागातून १००० चरित्र पुस्तकांचे यावल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये मोफत वितरण केले. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र व आरोग्य मासिकांचे हजारो वर्गणीदार विना कमिशन केले.
*ना नफा ना तोटा विक्री :-*
प्रकाशनाची डॉ. बाबासाहेबांची पुस्तके तसेच अन्य प्रकाशनाची स्वामी विवेकानंद , महात्मा फुले व संविधान यांची शेकडो चरित्र पुस्तके विशिष्ट दिनविशेष कार्यक्रम , शिबीरे , व्याख्यानमाला , मेळाव्या प्रसंगी प्रासंगिक पुस्तक विक्रीचे स्टॉल लावून पुस्तके रेल्वेस्टेशन, बस स्थानकावर आणि कार्यक्रमाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या श्रोत्यांशी संपर्क करून विकली.
*ग्रंथदान / ग्रंथ संकलन : -* मातोश्री सिंधुताई सुतार यांच्या अमृत महोत्सवनिमित्ताने एरंडोल नगरपालिका संचलित " पुस्तकांचा बगीचा वाचन " प्रकल्पास ७५ पुस्तकांचे पुस्तकांची आई भिमाई जोंधळे यांच्या व मातोश्रींच्या हस्ते ग्रंथदान तसेच व. वा. वाचनालय,जळगाव, जळगाव तहसील कार्यालयच्या प्रतीक्षा कक्षातील मोफत वाचनालय,माया माती फाउंडेशन, नोबेल फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठान, सुधर्मा संस्था, कलाग्राम नशिराबाद व ग्रामीण भागातील अनेक वाचनालयांना दर्जेदार पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथदान
टि . डब्ल्यू . जे. संस्था चिपळूण यांच्या मोफत वाचनालय प्रकल्पाला जिल्ह्यातील प्रकाशक, लेखक, सुजाण वाचक यांना आवाहन करून सुमारे २५ हजार रुपये किंमतीच्या पुस्तकांचे लोकसभागातून तसेच व्यक्तिशः ग्रंथदान
*प्रेरणादायी अभिनव उपक्रम :-* ग्रंथदानातून अक्षर दिवाळी फराळ हा
अभिनव उपक्रम आवार या ग्रामीण भागात राबवून शंभर वाचनीय पुस्तकांचे विद्यार्थ्यांना ग्रंथदान
*प्रासंगिक ग्रंथदानाचा दृढ संकल्प : -* रुग्णांना तसेच वाढदिवस , विवाह,परीक्षेतील यश, पुरस्कार प्राप्ती प्रसंगी अभिनंदनार्थ प्रसंगांन्वये यथोचित ग्रंथभेट
*अन्नदान :-* दिवाळी निमित्त दीनदलित, वंचित बालकांना तसेच स्थलांतरित मजुरांच्या लेकरांना, आनंदाश्रमातील कुटूंबाकडून उपेक्षित वयोवृद्ध बाबा - आजींना लोक सहभागाने तर कधी व्यक्तीश : दिवाळी मिष्टान्नाचे स्नेहादरपूर्वक वाटप
*आरोग्य :-* मरणोत्तर नेत्रदान संकल्प स्वतः करून जनप्रबोधनातून ७०० संकल्पपत्रे भरून नेत्रपेढीस सुपूर्द केले. मधुमेह निदान व उपचाराबाबत डॉक्टर व रुग्णांचे खुले चर्चासत्रे, व्याख्यानांचे आयोजन. समयोचित चित्र प्रदर्शनांचे आयोजन, रक्तदान शिबीरांच्या आयोजनात अमूल्य सहकार्य, मासिक पाळीच्या संदर्भात व वयात येतांना कार्यक्रमांचे ऑन / ऑफ लाईन शाळेत आयोजन. डॉक्टर्स डे निमित्त ग्रामीण व जिल्हास्तरीय डॉक्टरांचा सत्कार
*पर्यावरण :-* संस्थांच्या प्रांगणात , शाळेत , रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण / बिजारोपण, सातपुडा बचाव धरणे आंदोलनात सहभाग, जागतिक वनदिनानिमित्ताने पशुपक्षी यांच्या चित्रप्रदर्शनांचे आयोजन,पर्यावरणीय दिनविशेष लोकसहभागाने साजरे करणे, पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेऊन प्रकाशित करणे.
*अंधश्रद्धा निर्मूलन :-* अंधश्रद्धा निर्मूलनार्थ सप्रयोग व्याख्यानांचे आयोजन, स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्याचे कृती कार्यक्रम
*समाजातील गुणीजन व कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार :-* शिक्षक दिन व गुरुपौर्णिमा निमित्त निवृत्त शिक्षकांचा गृह सत्कार, ज्येष्ठ नागरिक दिन, मातृदिन, पितृदिन, कन्या दिन, जागतिक अपंग दिन, पत्रकार दिन, अभियंता दिन निमित्ताने मान्यवरांचा सत्कार
*साहित्य क्षेत्र :-* नवोदित लेखक कवींचे पुस्तक / पोस्टर्स प्रकाशन. लेखक आपल्या भेटीला उपक्रमांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळेत कार्यक्रमांचे आयोजनासह कविता वाचन आणि कविता पोस्टर्स प्रदर्शन ,जयंती पुण्यतिथी निमित्ताने समाज सुधारक व थोर व्यक्तींचे रंगभरण स्पर्धा, काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचे शालेय व खुल्या गटात बृहन महाराष्ट्रस्तरीय व जिल्हास्तरावर आयोजन ,दिवाळी तसेच प्रासंगिक विशेषांकांचे मानद संपादन, गौरव विशेषांकाचे संपादन
*विजय लुल्हे यांना आजतागायत प्राप्त झालेले विशेष पुरस्कार : -* 🔖राज्यस्तरीय पुरस्कार🔖 - कर्तव्यदक्ष शिक्षक पुरस्कार , आद्यकवी महर्षी वाल्मिक आदर्श शिक्षक पुरस्कार , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श कर्मचारी पुरस्कार , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार
🔖जिल्हास्तरीय पुरस्कार🔖 - नेशन बिल्डर अवार्ड, समर्थ कलाशिक्षक पुरस्कार , गुरु गोविंदसिंह एकता मानव सेवा पुरस्कार , महात्मा जोतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार , कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार , वसुंधरा हरित शिक्षक पुरस्कार , निसर्ग मित्र पुरस्कार , शतकवीर पुरस्कार यांसह
उपक्रमशील शिक्षक विशेष रौप्य पदके - २ प्राप्त , किनगाव बु॥ ता.यावल मरिमाता जिर्णोद्धार समितीतर्फे नागरी सत्काराने गौरवान्कित
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...