Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती

@ WEB TEAM 29 September 2026 970 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती

पुणे/प्रतिनिधी 


राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेले लढाऊ आणि चळवळ्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी, लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर, रासपचे राष्ट्रीय महासचिव बाळकृष्ण लेंगरे, राष्ट्रीय सचिव गोविंदराम सुरनर आणि प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 




 शिबिराच्या पहिल्या दिवशी कार्यकर्त्यांना राजकीय आणि सामाजिक चळवळींमध्ये सोशल मीडियाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. प्रथम सत्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी 'माधुरी हत्तीची लढाई कशी जिंकली?' या रंजक आणि प्रेरणादायी विषयावर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. द्वितीय सत्रात लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी 'झेंनजी समोर सरकार का नमलं?' या विषयावर प्रकाश टाकत, डिजिटल जगातील जनशक्तीची ताकद काय असू शकते हे समजावून सांगितले. तिसऱ्या सत्रात सोशल मीडिया अभ्यासक व माध्यमतज्ञ डॉ. योगेश बोराटे यांनी 'सोशल मीडियाधारित राजकारण, जबाबदारी आणि वापर' या विषयावर बोलताना, डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करताना पाळायची नैतिक जबाबदारी अधोरेखित केली. चौथ्या सत्रात डिजिटल मीडिया अभ्यासक व पत्रकार अण्णासाहेब चवरे यांनी सोशल मीडियाचा प्रत्यक्ष आणि प्रभावी वापर कसा करावा, याच्या तांत्रिक बाजू समजावून सांगितल्या.

  शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष संवाद आणि कायदेशीर बाजूंचे शिक्षण देण्यात आले. पाचव्या सत्रामध्ये पुरोगामी विचारांच्या पत्रकार अश्विनी सातव डोके यांनी 'प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडिया कसा हाताळावा?' या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सहाव्या सत्रात परिवर्तनवादी विचारांचे आधारस्तंभ ॲड. राजेंद्र गलांडे यांनी 'सोशल मीडियात काय करावे आणि काय करू नये?' या कायदेशीर व सामाजिक विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सजग राहण्याचा सल्ला दिला.

   कार्यक्रमाच्या सांगता समारंभाप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना मोलाचे दिशादर्शन केले. "आजच्या युगात सोशल मीडिया हे सर्वात मोठे शस्त्र आहे. पक्षाचे विचार, ध्येयधोरणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी या माध्यमाचा सकारत्मक वापर करावा," असे आवाहन त्यांनी केले.

   या संपूर्ण दोन दिवसीय प्रबोधन शिबिराचे यशस्वी आयोजन रासपचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवक प्रदेशाध्यक्ष अजित पाटील आणि डॉ. प्रसाद ओबासे यांनी केले होते. या शिबिराला राज्यभरातून रासपचे लढाऊ आणि चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड पुढील बातमी →ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)