Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

सेवेची वर्षे दिली, आता हक्काची पेन्शन द्या!” , १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन

@ WEB TEAM 27 September 2026 1,321 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
सेवेची वर्षे दिली, आता हक्काची पेन्शन द्या!” ,   १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनसाठी पंकजाताई मुंडे यांना निवेदन

अमळनेर प्रतिनिधी :

शिक्षण क्षेत्रात आयुष्याची अनेक वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावूनही आपल्या भविष्याच्या आर्थिक सुरक्षिततेच्या प्रश्नाने चिंतेत असलेल्या दिनांक १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. याच मागणीसाठी आज बीड येथे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.


“आम्ही सेवा दिली, योगदान दिले; आता निवृत्तीनंतरच्या आयुष्याची सुरक्षितता मिळावी,” अशी भावना यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.


वर्षानुवर्षांची सेवा; भविष्याची मात्र चिंता


१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि समाजाच्या उभारणीत योगदान देताना त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ सेवेसाठी दिला. मात्र निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न आजही त्यांच्या मनात कायम आहे.


जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ही मागणी केवळ आर्थिक लाभाची नसून अनेक कर्मचाऱ्यांच्या मते त्यांच्या प्रदीर्घ सेवेला मिळणाऱ्या सामाजिक व प्रशासकीय सुरक्षिततेशी संबंधित आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.


पंकजाताई मुंडे यांच्याकडे निवेदन


यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांचे निवेदन माननीय नामदार पंकजाताई मुंडे यांना देऊन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशतः अनुदानित कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी विनंती केली.


कर्मचाऱ्यांच्या या मागणीला शासनदरबारी योग्य व्यासपीठ मिळावे आणि प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


“पेन्शन म्हणजे केवळ पैसा नव्हे; ती निवृत्त आयुष्याची आधारवाट”


नोकरीच्या काळात कुटुंब, विद्यार्थी आणि समाजासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्या पेन्शनचा प्रश्न हा केवळ एका घटकाचा प्रश्न नसून वर्षानुवर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी जोडलेला संवेदनशील विषय असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


या मागणीसाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.


कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित


यावेळी मुख्याध्यापक गणेश परदेशी सर, सचिन पवार सर, चंदनशिव सर, रमेश चौरे सर, घनश्याम झोडगे सर, गुंजाळ सर, धनवडे सर, खुटाळे सर, कांबळे सर, काळकुटे सर, सोनवणे सर, निसर्गंध सर, जाधव सर, जगताप सर, साळुंके सर, काशिद सर, देशमुख सर, काळे सर, शेख सर, रसाळ सर, पठाण सर, जोगदंड सर, विश्वनाथ कदम सर, तसेच श्रीमती भुसारी मॅडम, गिलचे मॅडम, मस्के मॅडम यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.



ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल विजय पवार यांना ‘आदर्श अधिकारी रत्न-२०२६’ पुरस्काराने सन्मानित पुढील बातमी →२८ सप्टेंबर जागतिक माहिती अधिकार दिन

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)