Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न

@ WEB TEAM 28 September 2026 970 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्न



बुलढाणा प्रतिनिधी

राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर जि.जळगाव मार्फत देऊळगाव राजा जि.बुलढाणा येथे क्षमता बांधणी घटकांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम 2026 मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य शासन,बुलढाणा तसेच प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा- तालुका कृषी विभाग देऊळगाव राजा जि.बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जल व भुमी व्यवस्थापन संस्था , छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिवीका कौशल्य प्रशिक्षण एक दिवसीय 14 बॅच पुढील गावात घेण्यात आल्या त्या मध्ये सावखेड नागरे, पाडळी शिंदे ,शिवनी अरमाळ ,डिग्रस बु.,वाकी बु. अंढेरा, धोत्रा नंदई, गिरोली खु.तालुका देऊळगाव राजा जि बुलढाणा येथे संपन्न झाल्या सदर प्रशिक्षण दरम्यान पाणलोट विकास प्रकल्प अंतर्गत येणारे महीला शेतकरी गटांना प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण दरम्यान बचत गट यांनी उपजीवीका साठी कोणता उद्योग केला पाहिजेत असे सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण दरम्यान देण्यात आले त्या मध्ये उद्योग व्यवसाय निवड, बाजार पेठ, नेतृत्व, संघटन, या संदर्भात सविस्तर पणे साधन व्यक्ती यांनी मार्गदर्शन केल त्या मध्ये ग्रामीण उपजीवीका आव्हाने, उद्योग निर्मीती प्रक्रीया,उद्योग गुणसंपदा,यशस्वी उद्योजकाच्या भुमिका, उद्योग उभारणी व संधी शोध, ग्रामीण उपजीविकेची सुरक्षितता व शाश्वत उपजीविका विकासाच्या नविन वाटा इत्यादीं बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले प्रशिक्षण हे राष्ट्रविकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भुपेन्द्र महाले यांच्या मार्गदर्शनाने सुरु आहे प्रशिक्षण दरम्यान मृद व जलसंधारण विभाग बुलढाणा यांचे अधिकारी मा.श्री. विकास दडवी तालुका कृषी अधिकारी मा.श्री.भगवान कच्छवे, प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा प्रमुख मा.श्री आनंता आंबोरे, पथक प्रमुख मा.श्री एस ए वाघ ,सर्व गावातील कृषी सहाय्यक त्यामध्ये श्री विकास गुसळकार, श्री सचिन काकड, गजानन खंडारे,योगेश चेके,दिलीप सैदाणै, इंगळे साहेब,ढाकणे साहेब,समीती अध्यक्ष व सचिव ,ग्रामसेवक तसेच सदस्य गावातील महिला शेतकरी गट यांचे मोलाचे सहकार्य लाभले संस्थेमार्फत राष्ट्रविकास संस्थेचे सचिव तथा साधन व्यक्ती तुषार पाटील, अशोक पाटील, सुशिल केदारे, धम्मकीर्ती दामोदर,प्रथमेश सपकाळ, आदित्य शेगोकार, मुकेश पाटील यांनी सदर प्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन करुन यशस्वी केले


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील पुढील बातमी →धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)