Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

@ WEB TEAM 27 September 2026 1,020 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे    पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

अमळनेर प्रतिनिधी

यंदा २९ सप्टेंबर रोजी अंगारकी चतुर्थी असून, ही तिथी पितृपक्षाच्या कालावधीत येत असल्याने काही भाविकांमध्ये मंदिरात जावे की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र पितृपक्ष सुरू असल्यामुळे देवदर्शन करू नये, असा सार्वत्रिक धार्मिक नियम नाही. त्यामुळे कोणत्याही गैरसमजामुळे भाविकांनी श्री मंगळ ग्रह मंदिरातील दर्शन टाळू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे स्मरण, कृतज्ञता आणि त्यांच्या आत्मकल्याणासाठी श्रद्धेने विधी करण्याचा काळ मानला जातो. त्याचवेळी अंगारकी चतुर्थी ही श्री गणेशभक्तांसाठी अत्यंत श्रद्धेची तिथी आहे. पितरांचे स्मरण करणे आणि देवदर्शन घेणे या दोन स्वतंत्र धार्मिक श्रद्धा असून, त्यांच्यात विरोधाभास मानण्याचे कारण नाही.

अमळनेरचे श्री मंगळ ग्रह मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असून प्रत्येक अंगारकी चतुर्थीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. यंदा अंगारकी चतुर्थी पितृपक्षात येत असल्याने काही भाविकांनी पितृपक्षातील रूढ समजुतींमुळे मंदिरात जाणे टाळू नये. श्रद्धा ही भीतीवर नव्हे, तर सद्भावना, कृतज्ञता आणि सकारात्मक विचारांवर आधारित असावी, असा संदेश यानिमित्ताने देण्यात येत आहे.

पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने दान, अन्नदान अथवा धार्मिक विधी करणे आणि त्यानंतर अथवा त्याच काळात मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे—यामध्ये धार्मिकदृष्ट्या परस्परविरोध असणे आवश्यक नाही. प्रत्येक कुटुंबाच्या परंपरा आणि श्रद्धांचा आदर राखून भाविकांनी आपापल्या श्रद्धेनुसार धार्मिक आचरण करावे.

“पितरांचे स्मरण करूया, देवाचे दर्शन घेऊया आणि अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धेला विवेकाची जोड देऊया,” असा संदेश यंदाच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त देण्यात येत आहे.

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था, शिस्त आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे. भाविकांनी शांतता, संयम आणि शिस्त पाळत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.





ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमी“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; आमदार अनिल पाटील यांचा शेतकरी प्रश्नासाठी पाठपुरावा पुढील बातमी →उपक्रमशील विजय लुल्हे " संजीवन निवृत्त आदर्श शिक्षक " पुरस्काराने सन्मानित*

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)