Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; आमदार अनिल पाटील यांचा शेतकरी प्रश्नासाठी पाठपुरावा

@ WEB TEAM 26 September 2026 1,325 views 0 comments 7 min read
🔧 साधने:
“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; आमदार अनिल पाटील यांचा शेतकरी प्रश्नासाठी पाठपुरावा

अमळनेर: प्रतिनिधी-यंदा पाऊस नसल्याने हवालदिल झालेल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदार अनिल पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला असून मतदारसंघाचा महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश झाल्याने पीडित शेतकरी बांधवांना शासकीय मदतीचा हात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    याबाबत मदत व पुनर्वसन विभागाचा शासन आदेश 25 सप्टेंबर रोजी जाहीर होऊन यात दुष्काळग्रस्तांच्या यादीत अमळनेर मतदारसंघाचा समावेश झाला आहे.२०२६ च्या खरीप हंगामातील मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व विविध सवलतींचा मार्ग यातून उपलब्ध होणार असल्याने आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार 

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.


दुष्काळग्रस्त भागाचा केला दौरा

    

   दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना आधार देण्यासाठी आमदारांनी सतत आपला लढा सुरु ठेवला होता कालच आमदार अनिल पाटील यांनी शासकीय अधिकारी वर्गास सोबत घेत दुष्काळग्रस्त भागाचा केला दौरा केला प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी बांधवांच्या अडचणी आणि पिकांच्या परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी महसूल प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देत, पंचनाम्यांची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.दुष्काळाच्या परिस्थितीबाबत शासन संवेदनशील असून, संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी शेतकरी बांधवांना दिली. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी तसेच अमळनेर मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार उमा ढेकळे,कृषी अधिकारी, मंडळाधिकारी, तलाठी तसेच महसूल प्रशासनातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकरी बांधवांच्या प्रश्नांसाठी सक्रिय सहभाग नोंदवला.!


नाशिक येथील बैठकीतही उठविला आवाज


  याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे कृषी मंत्र्याच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक झाली होती त्या बैठकीतही आमदार अनिल पाटील यांनी पावसाअभावी मतदारसंघाची परिस्थिती संपुर्ण परिस्थिती मांडून शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.यावेळी त्यांनी सर्व तांत्रिक मुद्दे पटवुन देत काही निकष बाजुला ठेवून शेतकरी बांधवांना न्याय देण्याची मागणी केली होती.


महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली शासनाकडे आग्रही मागणी


    अमळनेर विधानसभा मतदारसंघातील अमळनेर व पारोळा तालुक्यांमध्ये दीड महिन्यापूर्वीच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके करपू लागली होती, यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला असताना पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली होती.

अश्या गंभीर परिस्थितीची तातडीने शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत तथा दिलासा द्यावा यासाठी आमदार अनिल पाटील यांनी शासनातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेऊन निवेदने सादर केली होती.यामध्ये मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार,कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात निवेदन देऊन अमळनेर व पारोळा तालुक्यांतील सद्यस्थितीची माहिती आमदारांनी दिली होती.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीअनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !... "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी पुढील बातमी →पितृपक्षात अंगारकी चतुर्थी; मंगळ ग्रह मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी यावे पितरांचे स्मरण आणि देवदर्शन हे परस्परविरोधी नाही; गैरसमज टाळण्याचे आवाहन

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)