Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !... "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी

@ WEB TEAM 26 September 2026 778 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !...    "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )    मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी
थोडक्यातथोडक्यात सारांश अनोरे येथे सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम धरणगाव तालुक्यातील अनोरे येथे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांच्या वडिलांच्या उत्तरकार्याचा सत्यशोधक पद्धतीने कार्यक्रम पार पडला. यावेळी संत-महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, सत्यशोधक प्रार्थना व प्रबोधन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर राहून सत्यशोधक विचारांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक पद्धतीने विधी केले. कार्यक्रमात उपस्थितांना महापुरुषांचे ग्रंथ भेट देण्यात आले तसेच वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लिंब, पिंपळ व वड वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. अनोरे गावात लवकरच ‘सावित्रीबाई जोतिराव फुले’ मालिकेचे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शन करण्याची घोषणा करण्यात आली. रोकडे परिवाराने सत्यशोधक समाज संघाला ११०० रुपयांचा निधीही सुपूर्त केला.

धरणगाव प्रतिनिधी - (पी डी पाटील)


धरणगांव - धरणगाव तालुक्यातील अनोरे गावाचे ज्ञानेश्वर दत्तू महाजन यांचे वडील निसर्गवासी दत्तू हरी महाजन यांचा गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना गाऊन प्रबोधन केले.

     याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून मुक्त होऊन सत्यशोधक विचारांनी मार्गक्रमण करावे. शिक्षण हे मानव मुक्तीचे साधन आहे.गुलामगिरी हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी सत्यशोधक विधी, विवाह, दशक्रिया विधी, गृहप्रवेश करावेत. मराठी वारसा यूट्यूब चैनल वरील सावित्रीबाई जोतिराव फुले ही मालिका सर्वांनी आवर्जून पहावी व खरा इतिहास समजून घ्यावा असे प्रतिपादन पाटील यांनी केले.

     माळी समाजाध्यक्ष हरी महाजन व सरपंच स्वप्निल महाजन यांनी मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ.सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी सर्व पित्रांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आली. रोकडे परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात लिंब ,पिंपळ , वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

      याप्रसंगी मधुकर नामदेव देशमुख ( उपाध्यक्ष बी जे विद्यालय ), हरी तुकाराम महाजन (माळी समाजाध्यक्ष ), स्वप्निल लक्ष्मण महाजन ( सरपंच ), भाऊसाहेब संभाजी पाटील ( पोलीस पाटील ), ज्ञानदेव राजाराम पाटील ( विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन) रवींद्र लोटन चव्हाण, त्र्यंबक रोकडे, रघुनाथ रोकडे, नामदेव रोकडे, सुरेश रोकडे,संतोष रोकडे,राजेंद्र रोकडे यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -

रोकडे परिवाराच्या वतीने उपस्थित त्यांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट !

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -

रोकडे परिवाराच्या वतीने शेतामध्ये वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण !

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -

लवकरच अनोरे गावात मोठ्या स्क्रीनवर मराठी वारसा यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " दाखविणार - हरी माझ्या ( माळी समाजाध्यक्ष अनोरे )

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -

अनोरे ग्रामस्थांनी यापुढे सत्यशोधक पद्धतीनेच विधी करावेत - स्वप्निल महाजन ( सरपंच अनोरे )

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -

रोकडे परिवाराच्या वतीने सत्यशोधक समाज संघाला 1100 रुपयांचा निधी सुपूर्त !

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -- - - - - - - -


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीनारळात दिसले गणरायाचे मुख! भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनावेळी भक्तिमय वातावरण पुढील बातमी →“दुष्काळाच्या सावटात अमळनेरला दिलासा; शेतकऱ्यांसाठी मदतीचा मार्ग खुला!” , दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश; आमदार अनिल पाटील यांचा शेतकरी प्रश्नासाठी पाठपुरावा

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)