Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

नारळात दिसले गणरायाचे मुख! भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनावेळी भक्तिमय वातावरण

@ WEB TEAM 26 September 2026 12,661 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
नारळात दिसले गणरायाचे मुख!  भडणे येथील देसले कुटुंबीयांचा भाविकांना अनोखा अनुभव; विसर्जनावेळी भक्तिमय वातावरण

भडणे (ता. शिंदखेडा) प्रतिनिधी

हिंदू संस्कृतीत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सव भडणे येथील एका शेतकरी कुटुंबासाठी यंदा अविस्मरणीय ठरला. गणरायाच्या विसर्जनावेळी नारळ फोडण्यासाठी तयार करत असताना नारळाच्या आतील भागात गणरायाच्या मूर्तीप्रमाणे मुखाकृती आणि लांब सोंडेसदृश आकार दिसून आल्याने उपस्थित भाविकांमध्ये कुतूहल आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले.


भडणे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पंढरीनाथ देसले यांनी यावर्षी नवीन वास्तूचे बांधकाम केल्याने आपल्या राहत्या घरी अकरा दिवस गणरायाची स्थापना केली होती. अकरा दिवस सकाळ-संध्याकाळ नियमित आरती, भजन तसेच विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. ज्ञानेश्वर पाटील व सौ. वैशाली पाटील हे स्वामींचे भक्त असून त्यांनी अत्यंत श्रद्धेने गणरायाची सेवा केली.


अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. विसर्जनापूर्वी नारळ फोडण्यासाठी तो तयार करत असताना त्यामध्ये गणरायाच्या मुखासारखी आकृती व लांब सोंड दिसून आली. हा अनोखा अनुभव पाहण्यासाठी उपस्थित भाविकांनी गर्दी केली आणि भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.


या घटनेची परिसरात चर्चा रंगली असून, देसले कुटुंबीयांसाठी हा गणेशोत्सवाचा अविस्मरणीय आणि भावनिक अनुभव ठरला आहे.


चौकट |

भाविकांचा विश्वास


> “भगवंतावर असलेली श्रद्धा, निष्ठा आणि प्रामाणिक सेवा यामुळेच आमच्या कुटुंबाला गणरायाचे दर्शन झाले. या अनुभवाने मनाला मोठे समाधान मिळाले.”

— ज्ञानेश्वर पाटील व सौ. वैशाली पाटील, भडणे


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीभुसावळ तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न युवकांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे – जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे पुढील बातमी →अनोरे गावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !... "गुलामगिरी " हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा जाहीरनामा आहे : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ ) मराठी वारसा या यूट्यूब चैनल वरील "सावित्रीबाई जोतिराव फुले मालिका " सहकुटुंब पहावी

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)