अंत्योदयाचा ध्यास, विचारांना अभिवादन! अमळनेरच्या तिरंगा चौकात पं. दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी
: एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त तिरंगा चौक, अमळनेर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ कार्यकर्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष अण्णा चौधरी, सोमा रावजी ठाकूर, दिलीप धोंडू ठाकूर, प्रा. डॉ. जयंत पटवर्धन, चंद्रशेखर कुलकर्णी सर, दिलीप गटलू साडी, गोकुळसिंग परदेशी, नगरसेवक विजय पंडित राजपूत, तुळशीराम भिकन हटकर, माजी नगरसेवक महेश पाटील, सरपंच भास्कर पाटील यांच्यासह दीपक पवार, दीपक पाटील, रवींद्र ठाकूर, देवा भाई, दीपक बोरसे, समाधान पाटील, उमेश वाल्हे, शितल देशमुख तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांना व अंत्योदयाच्या संकल्पनेला अभिवादन केले. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा व विकास पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...