Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वाराची मागणी व व्याख्यान संपन्न ! ,महात्मा फुले हेच खरे शिवजयंतीचे जनक - शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील ( कार्याध्यक्ष - संभाजी ब्रिगेड, जळगाव ) , टाकळी खुर्द गावातील लोकांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला दूर सारून सत्यशो

@ WEB TEAM 25 September 2026 1,185 views 0 comments 6 min read
🔧 साधने:
टाकळी खुर्द येथे सत्यशोधक प्रवेशद्वाराची मागणी व व्याख्यान संपन्न !    ,महात्मा फुले हेच खरे शिवजयंतीचे जनक - शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील ( कार्याध्यक्ष - संभाजी ब्रिगेड, जळगाव )  ,  टाकळी खुर्द गावातील लोकांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला दूर सारून सत्यशो

जामनेर प्रतिनिधी -


जामनेर : तालुक्यातील टाकळी खुर्द येथे संत शिरोमणी सावता महाराज मंदिरासमोर शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे बाळू चवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील होते प्रमुख अतिथी म्हणून शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रा.आकाश बिवाल, गणेश महाजन, अतिक नबी पिंजारी धनराज चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले,शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर टाकळी खुर्द गावाच्या वतीने मान्यवरांचे "सार्वजनिक सत्यधर्म "व "शिवाजी कोण होता ? गोविंद पानसरे " लिखित पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत सत्यशोधक रमेश दादा वराडे यांच्या संकल्पनेतून सत्यशोधक प्रवेशद्वार मागणी फलकाचे अनावरण करण्यात आले.संजय दुधे यांनी महापुरुषांचा जयघोष करत उत्साह निर्माण केला. बाळू चवरे व रमेश दादा वराडे यांनी गावकऱ्यांना सत्यशोधक समाजाच्या वाटेवर चालण्यासाठीचे आवाहन केले.

     प्रमुख व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी सुरूवातीला वामनदादा कर्डक यांचे " स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले " हे सुंदर गीत सादर केले. २४ सप्टेंबर शाक्त राज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व उपस्थितांसमोर विशद करत शिवराय - फुले - शाहू - आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत. महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची गरज आहे. स्वातंत्र्य - समता - बंधुता - न्याय हीच आपली मूल्य असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी डी पाटील यांनी सत्यशोधक प्रवेशद्वार मागणीचा ठराव सर्वानुमते पारित केला आणि लवकरच टाकळी बू:गावामध्ये मोठ्या दिमाखदार पद्धतीने प्रवेशद्वार उभे राहील अशी अपेक्षा व्यक्त केली. टाकळी खुर्द गावातील लोकांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला दूर सारत सत्यशोधक समाजाची कास धरावी. सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश, दशपिंड व गंधमुक्ती चे कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने करावेत. " सर्व साक्षी जगत्पती - त्याला नकोच मध्यस्ती " हे सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे म्हणून आपण त्रयस्त भट दलालांपासून दूर राहून आपल्याला भयमुक्त व शोषणमुक्त समाज निर्माण करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पी डी पाटील यांनी केले.

         कार्यक्रमाला माजी सरपंच समाधान वराडे, मंगलदास अहिरे, सारंगधर अहिरे, बाळू चवरे माळी, पवन माळी, फोटोग्राफर प्रवीण गावंडे व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, माळी महासंघ, एकता तरूण मित्र मंडळ, जय बजरंग मित्र मंडळ, रॉयल किंग ग्रुप,राजमाता व सावित्रीबाई फुले महिला बचत गट, सत्यशोधक समाज संघ या सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह टाकळी खुर्द गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सत्यशोधक कैलास महाजन व आभार रमेश दादा वराडे यांनी केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीटाकळी खुर्द येथे शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा ! ▪️सत्यशोधक विचारच आपल्याला तारतील - रमेश वराडे ( उपाध्यक्ष - सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा ) पुढील बातमी →अंत्योदयाचा ध्यास, विचारांना अभिवादन! अमळनेरच्या तिरंगा चौकात पं. दीनदयाल उपाध्याय जयंती उत्साहात

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)