विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य; लिनेस क्लब अमळनेरतर्फे स्कूल बॅग व खाऊचे वाटप पर्ल इंटरनॅशनल स्कूलमध्ये सामाजिक उपक्रम; ITI विद्यार्थ्यांनाही अल्पोपहाराचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी
: पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे आज लिनेस क्लब अमळनेरतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट सौ. कविता पारख, कॅबिनेट ऑफिसर सौ. परमिंदर कालरा तसेच लिनेस क्लब सदस्या व Micro Cabinet Officer Education सौ. जेस्मिन भरुचा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊही देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूलचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर उपस्थित होते. प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांनी फुल व श्रीफळ देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंजल पाटील मॅडम यांनी केले, तर उष्कर्षा लोकंक्षी मॅडम यांनी उपस्थित मान्यवर व पाहुण्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. विजय चौधरी सर, वैशाली पाटील मॅडम, राखी शर्मा मॅडम व श्री. सखाराम पावरा यांनी सहकार्य केले.
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिनेस क्लबतर्फे ITI मधील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचेही वाटप करण्यात आले.
सामाजिक सेवेतून विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...