टाकळी खुर्द येथे शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा ! ▪️सत्यशोधक विचारच आपल्याला तारतील - रमेश वराडे ( उपाध्यक्ष - सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा )

जळगाव प्रतिनिधी -
जामनेर : तालुक्यातील टाकळी खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर 'दुसरा शिवराज्याभिषेक दिन' (शाक्त राज्याभिषेक दिन) आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व पुरोगामी विचारांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे उपाध्यक्ष रमेश वराडे यांनी केले. यावेळी त्यांनी शाक्त राज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. बाळु माळी यांनी महापुरुषांच्या घोषणांचा जयघोष करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
कार्यक्रमाला माजी सरपंच समाधान वराडे, मंगलदास अहिरे, सारंगधर अहिरे, बाळू चवरे माळी व सत्यशोधक समाज संघाचे कार्यकर्ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते महासंघाचे कार्यकर्ते एकता तरूण मित्र मंडळ जय बजरंग मित्र मंडळ रॉयल किंग ग्रुप यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...