Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

आदर्श नेतृत्व अन् संघटित शक्ती! , आण्णासाहेब प्रताप साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्या साळी परिवाराची उल्लेखनीय वाटचाल"

@ WEB TEAM 25 September 2026 2,541 views 0 comments 16 min read
🔧 साधने:
आदर्श नेतृत्व अन् संघटित शक्ती!  ,   आण्णासाहेब प्रताप साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्या साळी परिवाराची उल्लेखनीय वाटचाल"
थोडक्यातआदरणीय प्रताप अण्णा साळी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, सस्नेह आणि अनंत शुभेच्छा! श्री भद्रा मारुती आणि कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी माता यांच्या कृपाशीर्वादाने आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, यश आणि निरंतर जनसेवेची ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या हातून समाजहिताची कार्ये अधिक व्यापक व्हावीत, उद्योगाची भरभराट होत राहावी आणि आपल्या कुटुंबाची एकजूट, प्रेम व संस्कारांची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच फुलत राहावी, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा! — वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! शुभेच्छुक ईश्वर आर महाजन पत्रकार 9860352960

अमळनेर प्रतिनिधी

सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रातील संघर्षशील नेतृत्व, सामाजिक बांधीलकी जपणारे व्यक्तिमत्त्व, श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचे संस्थापक व स्वीकृत नगरसेवक आदरणीय श्री. आण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी (प्रताप अण्णा) यांना २७ सप्टेंबर रोजी पडणाऱ्या वाढदिवसानिमित्त सस्नेह व मनःपूर्वक शुभेच्छा!


कष्टाची ज्यांना जाण आहे, अन् प्रामाणिकपणाची साथ,

गोरगरिबांच्या पाठीवर ज्यांचा नेहमीच असतो हात.

संघर्षातून उभारले ज्यांनी यशाचे हे उत्तुंग शिखर,

अण्णांच्या व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा करतो आज प्रत्येक जण!


अमळनेरच्या सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील एक विश्वासाचं नाव


अमळनेर शहराच्या सामाजिक, राजकीय आणि औद्योगिक पटलावर एक आदर्श, कर्तबगार, सर्वसमावेशक आणि माणुसकी जपणारे नेतृत्व म्हणून श्री. आण्णासाहेब प्रताप छबुलाल साळी अर्थात प्रताप अण्णा यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. २७ सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जन्मदिन नव्हे, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या एका प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करण्याचा दिवस आहे.


प्रताप अण्णांच्या व्यक्तिमत्त्वात उद्योजकाची दूरदृष्टी, समाजसेवकाची संवेदनशीलता, राजकीय कार्यकर्त्याची तळमळ आणि कुटुंबवत्सल माणसाची आपुलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.


वडिलांचा वारसा... संघर्षाची शिदोरी!


प्रताप अण्णांचा जीवनप्रवास सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झाला. साळी समाजातील धार्मिक आणि सामाजिक संस्कारांची शिदोरी त्यांना बालपणापासूनच मिळाली. आजी-आजोबांच्या काळापासून छोट्याशा हातमागावर विणकाम आणि त्यासोबत किराणा व्यवसाय असा कुटुंबाचा प्रवास होता.


त्यांचे वडील कै. छबुलाल शेठ साळी यांनी पहिलाडसारख्या गोरगरीब व मागासवर्गीय भागातील जनतेची अहोरात्र सेवा केली. मर्यादित सामाजिक व राजकीय पाठबळ असतानाही जनतेच्या विश्वासाच्या बळावर ते सलग तीन पंचवार्षिक नगरसेवक आणि आरोग्य सभापती राहिले. गरजू नागरिकांना मोफत उपचार आणि ऑपरेशन्सची सुविधा उपलब्ध करून देत त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला.


याच सेवाभावी संस्कारांचा वारसा प्रताप अण्णांनी पुढे समर्थपणे चालविला.


पितृछत्र हरपले... पण जिद्द हरली नाही!


लहान वयातच पितृछत्र हरपल्याने कुटुंबाची मोठी जबाबदारी प्रताप अण्णांच्या खांद्यावर आली. संकटाच्या त्या काळात आत्या, फुवा, भगिनी तसेच बंधू श्री. दीपक आबा आणि श्री. संदीप बापू यांनी दिलेली साथ त्यांच्या जीवनातील मोठी ताकद ठरली.


पारंपरिक किराणा व्यवसायासोबत रेशनिंगचे दुकान सुरू करण्यात आले. त्याचबरोबर आजी-वडिलांनी घेतलेल्या शेतीत स्वतः राबून, मजुरांच्या खांद्याला खांदा लावत वांगी, कांदे, मेथी, कोथिंबीर अशी विविध पिके घेण्यात आली. शेतीला पूरक म्हणून पोल्ट्री फार्म आणि गोट फार्म उभारण्यात आले.


कष्टाला पर्याय नाही आणि प्रामाणिकपणाला पर्याय असू शकत नाही, हा जीवनाचा मूलमंत्र जपत अण्णांनी प्रतिकूल परिस्थितीतून प्रगतीचा भक्कम पाया घातला.


जनसेवेपासून राजकीय प्रवासाला सुरुवात


वडिलांचा सेवाभावी वारसा आणि जनतेचा आग्रह यामुळे प्रताप अण्णांनी १९९१ मध्ये अमळनेर नगरपालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून निवडून येत जनसेवेच्या क्षेत्रात सक्रिय पाऊल ठेवले.


आरोग्य आणि सार्वजनिक सुविधांच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना मदतीचा हात देण्याचे काम त्यांनी पुढेही सुरू ठेवले. पुढे १९९६ मध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता प्रताप साळी यांनी पहिलाड भागातून नगरसेविका म्हणून निवडून येत कुटुंबाचा सेवाभावी वारसा पुढे नेला.


कुटुंबीय जबाबदाऱ्या आणि उद्योगातील वाढत्या व्यापामुळे प्रताप अण्णांनी काही काळ सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले; मात्र समाजसेवेची नाळ त्यांनी कधीही तोडली नाही. त्यांच्या दीर्घ अनुभवाची आणि सामाजिक योगदानाची दखल घेत २०२५ मध्ये अमळनेर नगरपालिकेत त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.


श्री भद्रा मारुतीच्या भक्तीतून उद्योगविश्वाला नवी दिशा


प्रताप अण्णांच्या जीवनप्रवासात श्री भद्रा मारुतीवरील निस्सीम श्रद्धेला विशेष स्थान आहे. कुटुंबाला मिळालेल्या मार्गदर्शनानंतर श्रीक्षेत्र भद्रा मारुतीच्या दर्शनाचा संकल्प करण्यात आला. दीपक आबांनी सलग पाच शनिवारी दर्शन पूर्ण केले आणि त्यानंतर कुटुंबाच्या आयुष्याला जणू नवी दिशा मिळाली.


२००५ सालापासून अमळनेर ते श्रीक्षेत्र भद्रा मारुती पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन सुरू करण्यात आले. भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने सुरू झालेली ही परंपरा आजही हनुमान भक्तांच्या सहभागातून सुरू आहे.


याच श्रद्धेच्या आणि कष्टाच्या बळावर श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाचा विस्तार होत गेला.


रु. ५०,०००च्या भागभांडवलावर सुरू झालेल्या श्री भद्रा प्रतीक कुशन अँड फर्निचर या व्यवसायापासून सुरू झालेला प्रवास आज विविध क्षेत्रांत विस्तारला आहे.


श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या विविध क्षेत्रांमध्ये—


- श्री भद्रा प्रतीक इलेक्ट्रॉनिक्स

- श्री भद्रा प्रतीक गृहसजावट व हँडलोम

- श्री भद्रा प्रतीक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स

- श्री भद्रा प्रतीक इन्व्हेस्टर प्लॉटिंग व शेती

- श्री भद्रा प्रतीक गारमेंट

- मंगरूळ MIDC येथील भव्य वेअरहाऊस


अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.


व्यवसायासोबत आधुनिकतेची नवी भरारी


अमळनेर शहरातील भद्रा प्रतीक मॉलमध्ये देशभरात प्रसिद्ध एस.एस. मोबाईलचे दालन सुरू करून प्रताप अण्णांनी व्यवसाय क्षेत्रात आणखी एक नवी भरारी घेतली आहे. अत्याधुनिक फीचर्स असलेले आकर्षक मोबाईल तसेच विविध इलेक्ट्रॉनिक वस्तूंची उपलब्धता असलेल्या या दालनाला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.


व्यवसाय वाढवत असतानाही ग्राहकांशी असलेले आपुलकीचे नाते आणि विश्वासाची भावना जपणे, ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष ओळख आहे.


‘चालते-बोलते विद्यापीठ’... माणुसकी जपणारा देवमाणूस!


प्रताप अण्णा म्हणजे अनेकांसाठी ‘चालते-बोलते विद्यापीठ’ आहेत. जीवनातील प्रदीर्घ अनुभव, माणसांची पारख, व्यवसायातील चढ-उतार आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घ प्रवास यामुळे त्यांच्याकडे अनुभवाची मोठी शिदोरी आहे.


प्रत्येकाशी आपुलकीने वागणे, अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे आणि माणसांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणे, हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू आहे. त्यामुळेच ‘माणुसकी जपणारा देवमाणूस’ अशी भावना त्यांच्या सहवासातील अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे.


त्यांच्या परिवारातील प्रत्येक सदस्यही प्रेमळ, मितभाषी आणि मैत्रीचा हात पुढे करणारा आहे. त्यामुळे साळी परिवाराशी जोडले जाणे म्हणजे आपुलकी आणि आपलेपणाचा अनुभव घेणे, असे अनेकांना वाटते.


एकजूट परिवार... पुढच्या पिढीची सक्षम वाटचाल


साळी परिवाराची खरी ताकद म्हणजे एकजूट, एकसंघ विचार आणि एकत्र कुटुंब पद्धती. परिवारातील प्रत्येक सदस्याच्या योगदानामुळे उद्योग आणि सामाजिक कार्याला बळ मिळत गेले.


श्री. दीपक आबा साळी यांनी सलग दोन पंचवार्षिक अर्बन बँकेचे संचालक तसेच माजी व्हाईस चेअरमन म्हणून आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटविला आहे.


पुढील पिढीतील चिरंजीव प्रसन्नजीत (विकी) आणि चिरंजीव अक्षय (मॉन्टी) यांनी आजोबा, वडील आणि काकांचा व्यवसाय व समाजकारणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला आहे. युवा उद्योजक म्हणून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करत व्यवसायाला नवी दिशा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.


साळी समाजाच्या नेतृत्वाची जबाबदारी


प्रताप अण्णांचे सामाजिक कार्य केवळ अमळनेरपुरते मर्यादित राहिलेले नाही. गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांतील साळी समाज कार्यकारिणीवर प्रमुख सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. तसेच अमळनेर साळी समाजाचे अध्यक्ष म्हणून समाजाच्या विकासासाठी आणि विविध संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत.


समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेणे, युवकांना प्रोत्साहन देणे, सामाजिक उपक्रमांना पाठबळ देणे आणि समाजातील घटकांना एकत्र आणणे, या माध्यमातून त्यांनी सामाजिक नेतृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


संघर्षातून समृद्धी... आणि समृद्धीतून समाजसेवा!


प्रताप अण्णांचा जीवनप्रवास एका वाक्यात सांगायचा झाला तर तो म्हणजे—‘संघर्षातून समृद्धीकडे आणि समृद्धीतून जनसेवेकडे!’


शून्यातून उभा राहिलेला व्यवसाय, संकटांवर मात करत सावरलेले कुटुंब, वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा, राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, श्री भद्रा मारुतीवरील अढळ श्रद्धा, उद्योगविश्वातील विस्तार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकीची जपलेली नाळ—या सर्वांचा सुंदर संगम म्हणजे प्रताप अण्णांचे व्यक्तिमत्त्व.


‘जे करायचे ते मनापासून करायचे’ या विचाराने वाटचाल करणाऱ्या प्रताप अण्णांनी पैशापेक्षा माणसांना अधिक महत्त्व दिले. गेल्या अनेक दशकांपासून समाजसेवेचा वसा जपत त्यांनी असंख्य माणसांशी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या संघर्षाला, कर्तृत्वाला, समाजसेवेला आणि माणुसकीला मनापासून सलाम!


🌸 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸


आदरणीय प्रताप अण्णा साळी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक, सस्नेह आणि अनंत शुभेच्छा!


श्री भद्रा मारुती आणि कुलस्वामिनी श्री सप्तशृंगी माता यांच्या कृपाशीर्वादाने आपणास दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी, यश आणि निरंतर जनसेवेची ऊर्जा लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


आपल्या हातून समाजहिताची कार्ये अधिक व्यापक व्हावीत, उद्योगाची भरभराट होत राहावी आणि आपल्या कुटुंबाची एकजूट, प्रेम व संस्कारांची परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच फुलत राहावी, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा!


— वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

🎂💐🎂🎂💐💐💐



ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीबापूराव पाटील (ठाकरे) यांना 'राज्यस्तरीय समर्थ पत्रकारिता गौरव पुरस्कार' जाहीर पुढील बातमी →टाकळी खुर्द येथे शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन साजरा ! ▪️सत्यशोधक विचारच आपल्याला तारतील - रमेश वराडे ( उपाध्यक्ष - सत्यशोधक समाज संघ जळगाव जिल्हा )

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)