Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

बापूराव पाटील (ठाकरे) यांना 'राज्यस्तरीय समर्थ पत्रकारिता गौरव पुरस्कार' जाहीर

पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; ४ ऑक्टोबरला शेगाव येथे होणार भव्य सन्मान
@ WEB TEAM 25 September 2026 1,098 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
बापूराव पाटील (ठाकरे) यांना 'राज्यस्तरीय समर्थ पत्रकारिता गौरव पुरस्कार' जाहीर
थोडक्यातबापूराव पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याचे वृत्त समजताच पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात सातत्य, निर्भीडता आणि सामाजिक बांधिलकी जपत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अमळनेर येथील ज्येष्ठ पत्रकार बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे) (मूळ रा. मंगरुळ, ता. चोपडा; ह.मु. प्रतापमिल कंपाऊंड, अमळनेर) यांची अत्यंत प्रतिष्ठित अशा 'राज्यस्तरीय समर्थ पत्रकारिता गौरव पुरस्कारा'साठी निवड करण्यात आली आहे. समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठान, चिखली (जि. बुलढाणा) यांच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, या बातमीने अमळनेरच्या पत्रकारिता, सामाजिक व शैक्षणिक वर्तुळात प्रचंड आनंदाचे वातावरण पसरले आहे.

समर्थ बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रेणुकादास मुळे यांनी २४ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत निवडपत्राद्वारे या सन्मानाची घोषणा केली.

सडेतोड पत्रकारिता आणि बहुआयामी सामाजिक योगदान

बापूराव पाटील (ठाकरे) हे गेल्या अनेक वर्षांपासून अमळनेर व खान्देश परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून जनहिताचे प्रश्न पोटतिडकीने मांडत आहेत. त्यांच्या अष्टपैलू कार्याची व्याप्ती:

  • व्हॉईस ऑफ मीडिया: आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून कार्यरत.
  • दैनिक बातमीदार: १९३५ च्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ‘दैनिक बातमीदार’ वृत्तपत्राचे अमळनेर ब्युरो चीफ.
  • शैक्षणिक क्षेत्र: अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या साने गुरुजी विद्यामंदिर येथे समर्पित शिक्षक.
  • साहित्य व सामाजिक संस्था: अमरावती येथील नामांकित ‘बांधिलकी प्रतिष्ठान’चे जळगाव जिल्हाध्यक्ष व ‘शिवरथ प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष.

संत नगरी शेगाव येथे ४ ऑक्टोबरला भव्य सोहळा

हा राज्यस्तरीय गौरव सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता श्री क्षेत्र संत गजानन महाराजांची पावन भूमी शेगाव येथे पार पडणार आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते बापूराव पाटील (ठाकरे) यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल.

अमळनेरकरांकडून अभिनंदनाचा वर्षाव!

बापूराव पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याचे वृत्त समजताच पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीकर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज* *प्रा दिलीप जाधव यांचे प्रतिपादन* पुढील बातमी →आदर्श नेतृत्व अन् संघटित शक्ती! , आण्णासाहेब प्रताप साळी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरच्या साळी परिवाराची उल्लेखनीय वाटचाल"

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)