कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज* *प्रा दिलीप जाधव यांचे प्रतिपादन*

*कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज*
*प्रा दिलीप जाधव यांचे प्रतिपादन*
सांगली, प्रतिनिधी: कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण व सर्वसामान्यांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहचवून सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली.त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या बळवंत काॅलेज विटाचे ज्युनिअर विभागाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दिलीप जाधव यांनी केले.साखरपा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ओंकार कोलते होते.
प्रा.जाधव म्हणाले, आपल्या सांस्कृतिक परंपरेत बौद्धिक आणि शारीरिक श्रमाची फारकत केली आहे.बौध्दीक श्रमाकडे प्रतिष्ठेने आदराने पाहिले जाते.कर्मवीरांनी श्रमाधिष्ठीत शिक्षण हा मूलमंत्र केला.कमवा व शिका ही योजना विद्यार्थ्यांमध्ये जगण्याची जिद्द निर्माण करणारी होती.स्वाध्याय, स्वाभिमान आणि स्वावलंबन ही ही अक्षरे गोरगरीब पोरांच्या आयुष्याच्या पाठीवर कोरली म्हणूनच आजचा महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहिला आहे.
आज नवीन शैक्षणिक धोरण येत, जेव्हा कौशल्याधारित शिक्षणाबद्दल बोलले जाते, तेव्हा कर्मवीरांनी शंभर वर्षांपूर्वी जे करुन दाखवले ते आज स्वीकारले जात आहे. असे ते म्हणाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना ओंकार कोलते यांनी कर्मवीरांनी अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या अंधारात पिचत पडलेल्या समाजाला ज्ञान प्रकाशाच्या वाटेवर आणले,मानवतेचा मंत्र दिला.आण्णांच्या विचारांचे नवे प्रकाशपर्व पुन्हा नव्याने उभे राहिल.प्रत्येकाने प्रकाशपर्व उभे करण्याचा संकल्प जयंतीनिमित्त करुया.
प्रारंभी प्रा दिलीप जाधव यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विजय बाईंग यांनी केले.विविध स्पर्धात नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनींना पारितोषिके प्रदान करण्यात आली व अमोल लाड यांनी शाळेस स्याॅनिटरी नॅपकीन मशीन भेट दिली.कु.दुर्गा लिंगायत,कु.केतकी लिंगायत, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संदेश उर्फ बापूसाहेब शेटे,किरबेट केंद्राचे प्रमुख बाबासाहेब लाड, अमोल लाड यांनी मनोगते व्यक्त केली.सरपंच सौ.रश्मी साळसकर, सौ.मानसी गुरव, अतुल शिर्के, मुबारक शेख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन सौ.संगिता कांबळे यांनी केले तर आभार प्रा.अनिल पावटे यांनी मानले.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...