Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान रुजविण्याचा संकल्प; धनदाई महाविद्यालयात NSS दिवस उत्साहात

@ WEB TEAM 24 September 2026 384 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान रुजविण्याचा संकल्प; धनदाई महाविद्यालयात NSS दिवस उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी: धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयवंतराव पाटील, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस असून देशभरात हा दिवस साजरा केला जातो, असे त्यांनी सांगितले.

     राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. लीलाधर पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाटचालीचा आढावा घेतला. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, सामाजिक भान आणि लोकशाही मूल्यांची जडणघडण करणे हा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘नॉट मी बट यू’ या भावनेतून प्रत्यक्ष समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य सुरू असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

     अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासातील महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

     कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीअमळनेर तालुक्यात सेवा संकल्प अभियान निमित्ताने महावितरणची झाली बैठक विविध योजनांची माहिती ग्राहकांना द्या-आमदार अनिल पाटील पुढील बातमी →कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची गरज* *प्रा दिलीप जाधव यांचे प्रतिपादन*

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)