अमळनेर तालुक्यात सेवा संकल्प अभियान निमित्ताने महावितरणची झाली बैठक विविध योजनांची माहिती ग्राहकांना द्या-आमदार अनिल पाटील
.jpg)
अमळनेर तालुक्यात सेवा संकल्प अभियान निमित्ताने महावितरणची झाली बैठक
विविध योजनांची माहिती ग्राहकांना द्या-आमदार अनिल पाटील
अमळनेर :-विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सेवा संकल्प अभियान निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता (धरणगाव विभाग) सोनगिरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता (अमळनेर शहर) ज्ञानेश्वर अंबाडकर, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र वाणी (धरणगाव विभाग), उपकार्यकारी अभियंता (अमळनेर ग्रामीण) भावसार आदी अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सेवा संकल्प अभियान निमित्ताने महावितरणच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्याचे आदेश आमदार यांनी दिले. यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना (स्मार्ट) आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यांचा समावेश आहे. तहसील कार्यालय, अमळनेर येथे दि. 17 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
पीएम सूर्यघर योजना :-3 किलोवॅटपर्यंत सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना अंदाजे 78,000 रुपये अनुदान मिळणार असून, यामुळे ग्राहकांचे वीज बिल पुढील 25 वर्षांसाठी शून्य होणार आहे.
स्वयंपूर्ण महाराष्ट्र रूफटॉप सोलर योजना :- मागील वर्षभरात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांना महावितरणतर्फे कमी दरात सोलर बसवून दिले जाणार आहे. 1 किलोवॅट इंस्टॉलेशनसाठी ओपन व ओबीसी : अंदाजे 10,000 रुपये, एससी व एसटी : अंदाजे 5,000 रुपये, बीपीएल : फक्त 2,500 रुपये. प्रत्यक्ष किंमत अंदाजे 60,000 ते 70,000 रुपये असून, उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाचे अनुदान म्हणून वर्ग केली जाईल.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना :- शेतकऱ्यांना सिंचनासाठी स्वतंत्र व शाश्वत सौर कृषी पंप योजना. सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के, तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ 5 टक्के रक्कम भरून पूर्ण सौर पंप संच मिळणार असून उर्वरित रक्कम केंद्र व राज्य शासनाचे अनुदान असेल. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपीचे पंप उपलब्ध, 5 वर्षांची दुरुस्ती हमी व इन्शुरन्ससह, तसेच वीजबिल व लोडशेडिंगची चिंता नाही.
इच्छुक ग्राहकांनी तहसील कार्यालयातील महावितरणच्या सेवा सेतू स्टॉलवर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...