Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

धरणगावात शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात ▪️शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान-गुलाबराव वाघ

@ WEB TEAM 24 September 2026 1,013 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
धरणगावात शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात    ▪️शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान-गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी -( पी. डी. पाटील)


धरणगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ 'दुसरा शिवराज्याभिषेक दिन' (शाक्त राज्याभिषेक दिन) आणि सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व पुरोगामी विचारांचे स्मरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी शाक्त राज्याभिषेक दिन तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा इतिहास आणि सामाजिक महत्त्व उपस्थितांसमोर विशद केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासही माल्यार्पण करण्यात आले. संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी महापुरुषांच्या घोषणांचा जयघोष करत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. यावेळी बोलताना शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ यांनी, “शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान आहेत,” असे प्रतिपादन केले. सामाजिक समता, शिक्षण, न्याय आणि मानवमुक्तीचा विचार पुढे नेण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे आचरण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, माळी समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, पाटील समाजाध्यक्ष माधवराव पाटील, काँग्रेसचे ओबीसी राज्य सचिव रामचंद्र महाजन, शिवसेनेचे गटनेते विलास महाजन, प्रा. भदाणे सर, सचिव आर. डी. महाजन, नगरसेविका हेमांगी किरण अग्निहोत्री, काँग्रेस नेते सुनील सोनार, राजेंद्र महाजन, पत्रकार विकास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तसेच माहिती अधिकार कायदा संघाचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाजाचे प्रचारक एच. डी. माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, संत सावता माळी युवक संघाचे विभागीय अध्यक्ष विनायक महाजन, तालुकाध्यक्ष दिनेश महाजन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र महाजन, सामाजिक कार्यकर्ते भीमराव पाटील, सूरज वाघरे, सुधाकर मोरे, डी. ए. पाटील, गोरख देशमुख, गोपाल महाजन, सोमनाथ चित्ते, भैय्या धनगर, गुलाब महाजन यांच्यासह सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यशोधक विचार मंच, धरणगाव संत सावता माळी युवक संघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि धरणगाव सत्यशोधक समाज संघ यांच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीधानोरा आरोग्य केंद्रात CPHC कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून "समग्र प्राथमिक आरोग्य सेवे "चे घेतले धडे. पुढील बातमी →अमळनेर तालुक्यात सेवा संकल्प अभियान निमित्ताने महावितरणची झाली बैठक विविध योजनांची माहिती ग्राहकांना द्या-आमदार अनिल पाटील

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)