Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

धानोरा आरोग्य केंद्रात CPHC कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून "समग्र प्राथमिक आरोग्य सेवे "चे घेतले धडे.

@ WEB TEAM 24 September 2026 1,029 views 0 comments 10 min read
🔧 साधने:
धानोरा आरोग्य केंद्रात CPHC कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून "समग्र प्राथमिक आरोग्य सेवे "चे घेतले धडे.
थोडक्यातप्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे CPHC कार्यशाळेतून आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना समग्र प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे. तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन; ग्रामीण जनतेपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रशिक्षणार्थींचा निर्धार

धानोरा आरोग्य केंद्रात CPHC कार्यशाळेतून तज्ज्ञांकडून "समग्र प्राथमिक आरोग्य सेवे "चे घेतले धडे.


 प्राथमिक आरोग्य केंद्र धानोरा येथे CPHC कार्यशाळेतून आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांना समग्र प्राथमिक आरोग्य सेवेचे धडे.

तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन; ग्रामीण जनतेपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रशिक्षणार्थींचा निर्धार


धानोरा प्रतिनिधी

: प्राथमिक आरोग्य केंद्र, धानोरा येथे “समग्र प्राथमिक आरोग्य सेवा” (Comprehensive Primary Health Care – CPHC) कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी, CHO, आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक आदी प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा प्रशिक्षण कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर यांचे मार्गदर्शनाने,

 जिल्हा प्रशिक्षण कार्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दिपक वाणी यांचे नियोजनाने..

या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांनी प्राथमिक आरोग्य सेवेच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून निरसन केले.


गरोदर माता व मातृ आरोग्य:-

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद वाघ यांनी गरोदर मातांची नोंदणी, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीनंतरची काळजी, मातृ आरोग्याचे महत्त्व तसेच जोखमीच्या गर्भधारणेची वेळेत ओळख याबाबत मार्गदर्शन केले. गरोदर मातेला वेळेवर आवश्यक तपासण्या, समुपदेशन व संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.


नवजात व बाल आरोग्य:-

बालरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कळसकर यांनी नवजात शिशू व अर्भकांच्या आरोग्यसेवेबाबत माहिती दिली. नवजात बालकांची आवश्यक काळजी, धोक्याची लक्षणे ओळखणे, योग्य वेळी वैद्यकीय उपचार व संदर्भ सेवा तसेच बालकांच्या आरोग्याच्या सातत्यपूर्ण देखरेखीबाबत प्रशिक्षण देण्यात आले.


किशोरवयीन आरोग्य:-

डॉ.चंद्रकांत सूर्यवंशी यांनी प्रशिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट करताना किशोरवयीन मुला-मुलींच्या आरोग्याशी संबंधित विविध बाबींवर मार्गदर्शन केले. किशोरवयातील शारीरिक व मानसिक बदल, आरोग्यविषयक समस्या आणि त्याबाबत योग्य समुपदेशनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.


संसर्गजन्य रोगांचे निदान व व्यवस्थापन:-

डॉ. गिरीश गोसावी, तालुका आरोग्य अधिकारी,अमळनेर यांनी संसर्गजन्य रोगांचे निदान, प्रतिबंध व व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली. संशयित रुग्णांची वेळेत ओळख, आवश्यक तपासण्या, उपचाराची उपलब्धता आणि रोगाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.


सांसर्गिक रोगांबाबत मार्गदर्शन:-

डॉ.चेतन पाटील, वैद्यकीय अधिकारी यांनी सांसर्गिक आजारांचे निदान व व्यवस्थापन यावर प्रशिक्षण दिले. समुदायामध्ये आजारांची लक्षणे आढळल्यास आरोग्य यंत्रणेला वेळेत माहिती देणे, रुग्णांचे योग्य व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपाय याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.


नाक-कान-घसा आरोग्य:-

डॉ. शिवदास चव्हाण, नाक-कान-घसा तज्ज्ञ यांनी नाक, कान व घशाशी संबंधित सामान्य आजार, त्यांची प्राथमिक लक्षणे आणि आवश्यक वेळी तज्ज्ञ उपचारासाठी रुग्णांना संदर्भित करण्याबाबत माहिती दिली.


मौखिक आरोग्याची मूलभूत काळजी:-

डॉ. मोनिका देसाई, दंत चिकित्सक यांनी मौखिक आरोग्याच्या मूलभूत काळजीबाबत मार्गदर्शन केले. दात व हिरड्यांची नियमित स्वच्छता, मौखिक आरोग्याच्या समस्या वेळेत ओळखणे आणि आवश्यक उपचार घेण्याचे महत्त्व प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यात आले.


मानसिक आरोग्य:-

दौलत निमसे, मानसोपचार तज्ज्ञ यांनी मानसिक आजारांचे प्राथमिक स्तरावरील व्यवस्थापन, मानसिक आरोग्याच्या समस्या ओळखणे, रुग्ण व कुटुंबीयांशी संवेदनशीलतेने संवाद साधणे तसेच गरजेनुसार योग्य संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले.

योग व आयुष उपचार पद्धती

डॉ. प्रिती पाटील, CHO यांनी योग व आयुष उपचार पद्धतींचे आरोग्य संवर्धनातील महत्त्व स्पष्ट केले. दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी, योगाभ्यास आणि प्रतिबंधात्मक आरोग्य दृष्टिकोन याबाबत प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यात आली.


कुटुंब कल्याण, गर्भनिरोधक व लसीकरण:-

प्रेमलता पाटील, ANM यांनी कुटुंब कल्याण सेवा, विविध गर्भनिरोधक साधनांचे व्यवस्थापन आणि लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. पात्र लाभार्थ्यांना योग्य माहिती व समुपदेशन देऊन आरोग्य सेवांचा प्रभावी लाभ मिळवून देण्यावर भर देण्यात आला.


आरोग्य विषयक जनजागृती व प्रसिद्धी:-

विद्या कंगाले, जिल्हा प्रसिद्धी अधिकारी यांनी आरोग्यविषयक जनजागृती, प्रभावी संवाद आणि आरोग्य संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले.


विशेष उपस्थिती

या प्रशिक्षण कार्यशाळेस वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली सरोदे, डॉ. मेघराज महाले, सुनील शिंदे (जिल्हा प्रशिक्षण केंद्र, आरोग्य निरीक्षक), विजय देशमुख (तालुका आरोग्य निरीक्षक) यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी,आरोग्य कर्मचारी,उपस्थित होते.


प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्यक्ष सेवेत पोहोचविण्याचा निर्धार

कार्यशाळेच्या समारोपावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी दोन दिवसीय प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 


प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार अधिक प्रभावी, समन्वयित आणि गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी निश्चितच मदत होणार असल्याचे प्रशिक्षणार्थींनी सांगितले.


प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न ठेवता त्याचा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपयोग करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींनी व्यक्त केला.


प्राथमिक आरोग्य केंद्र-धानोराच्या वतीने सर्व तज्ञ प्रशिक्षकांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर दोन दिवसीय “समग्र प्राथमिक आरोग्य सेवा" (CPHC) प्रशिक्षण कार्यशाळेची खेळीमेळीचे वातावरणात सांगता करण्यात आली.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीपॅकेज’च्या मोहापेक्षा आवड, क्षमता ओळखून करिअर निवडा : प्रा. दिनेश महाजन पुढील बातमी →धरणगावात शाक्त राज्याभिषेक दिन व सत्यशोधक समाज स्थापना दिन उत्साहात ▪️शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर हेच आपले प्रेरणास्थान-गुलाबराव वाघ

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)