बालभारतीच्या पुस्तक परीक्षणासाठी निवड; डॉ. बी.डी. शिरसाट यांचा पतपेढीतर्फे सत्कार

धरणगाव विशेष प्रतिनिधी(किरण चव्हाण)
एरंडोल व धरणगाव माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या सन २०२६ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पी.आर. हायस्कूल, धरणगाव येथील उपशिक्षक तथा मराठी विषयाचे नाशिक व पुणे बोर्डाचे चीफ मॉडरेटर आयुष्यमान डॉ. बापूसाहेब बी.डी. शिरसाट यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
इयत्ता सहावीच्या नवीन मराठी प्रथम भाषा विषयाच्या पाठ्यपुस्तक परीक्षणासाठी बालभारती, पुणे या संस्थेत परीक्षक म्हणून डॉ. शिरसाट यांची निवड झाल्याबद्दल पतपेढीच्या वतीने त्यांना सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
पतपेढीचे विद्यमान अध्यक्ष आर.एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस पतपेढीचे मार्गदर्शक आबासाहेब सी.के. पाटील, शिक्षक सेनेचे नेते दादासाहेब आर.टी. पाटील, मानद चिटणीस सुनील पाटील भाऊसाहेब तसेच सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी एरंडोल व धरणगाव तालुक्यातील पतपेढीचे सभासद तसेच त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिरसाट यांच्या निवडीबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...