Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

धाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण

दहा पिढ्यांपासूनची परंपरा आजही कायम; शेगावच्या गजानन महाराजांच्या जीवनचरित्राचा देखाव्यातून जागर
@ WEB TEAM 19 September 2026 874 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
धाडकर परिवाराची महालक्ष्मीची आकर्षक आरास ठरली भाविकांचे आकर्षण
थोडक्यातधार्मिक श्रद्धा, कलात्मक कल्पकता आणि अध्यात्मिक संदेश यांचा सुंदर संगम या आरासीत पाहायला मिळाला. त्यामुळे महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आरास पाहण्यासाठीही मोठी गर्दी केली. अनेक भाविकांनी सजावटीचे कौतुक करत गजानन महाराजांचे जीवनचरित्र जाणून घेतले आणि महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतले.

अमळनेर प्रतिनिधी


अमळनेर शहरातील धाडकर परिवारामध्ये गेल्या दहा पिढ्यांपासून महालक्ष्मी स्थापनेची धार्मिक परंपरा नित्यनियमाने जपली जात आहे. यंदाही भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवानंतर तीन दिवसांच्या महालक्ष्मी उत्सवानिमित्त धाडकर परिवारात भक्तिमय वातावरणात महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली. यावेळी करण्यात आलेली आकर्षक सजावट व धार्मिक देखावा भाविकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

गं. भा. श्रीमती सीमा धाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा धार्मिक उपक्रम श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडतो. यावर्षी अमोल धाडकर, सुमित धाडकर, विद्या धाडकर आणि स्वानंदी धाडकर यांनी विशेष मेहनत घेऊन महालक्ष्मीची मनोहारी आरास साकारली. या सजावटीला भाविकांनी उत्स्फूर्त दाद देत कौतुक केले.


शेगावच्या गजानन महाराजांचा जीवनप्रवास आरासीतून साकारला


यंदाच्या आरासीत विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या जीवनचरित्राचा देखावा. आरासीत गजानन महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले असून, त्यांच्या जीवनचरित्रातील संपूर्ण २१ अध्यायांची माहिती भाविकांना समजेल अशा पद्धतीने मांडण्यात आली. तसेच शेगावच्या श्री गजानन महाराज मंदिराचा प्रतिकात्मक देखावाही अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आला.


धार्मिक श्रद्धा, कलात्मक कल्पकता आणि अध्यात्मिक संदेश यांचा सुंदर संगम या आरासीत पाहायला मिळाला. त्यामुळे महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी आरास पाहण्यासाठीही मोठी गर्दी केली. अनेक भाविकांनी सजावटीचे कौतुक करत गजानन महाराजांचे जीवनचरित्र जाणून घेतले आणि महालक्ष्मीचे आशीर्वाद घेतले.


तीन दिवसांचा धार्मिक सोहळा


धाडकर परिवाराच्या परंपरेनुसार भाद्रपद महिन्यात गणपती स्थापनेनंतर तीन दिवस महालक्ष्मीचे आगमन होते. पहिल्या दिवशी ज्येष्ठा व कनिष्ठ गौरीचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा व कनिष्ठ देवीचे विधिवत पूजन करण्यात येते, तर तिसऱ्या दिवशी धार्मिक विधी पार पडल्यानंतर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते.

या तीन दिवसांत घराघरांत विविध प्रकारच्या आकर्षक आरास केल्या जातात. त्यामध्ये धाडकर परिवाराने साकारलेली यंदाची आरास विशेष चर्चेचा विषय ठरली. दहा पिढ्यांपासून जपली गेलेली ही परंपरा नव्या पिढीनेही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पुढे नेल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.

धाडकर परिवाराच्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे परंपरा, भक्ती आणि सर्जनशीलतेचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळाला. आरास पाहण्यासाठी तसेच महालक्ष्मीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

 


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीअमळनेर रेल्वे स्थानकावर स्वच्छता जनजागृतीचे पथनाट्य पुढील बातमी →टेबल टेनिसमध्ये पी.बी.ए.च्या मुलींचा डंका; जिल्हास्तरीय विजेतेपदासह विभागीय स्पर्धेत प्रवेश

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)