Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
खान्देश

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई

महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त धडक कारवाई; सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
@ WEB TEAM 18 September 2026 375 views 0 comments 4 min read
🔧 साधने:
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई
थोडक्यातगिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमित तपासणी व धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या २९ वाहनांवर कारवाई 


 महसूल, पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची संयुक्त धडक कारवाई; सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात


जळगाव प्रतिनिधी 

गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने आज सकाळी ५ वाजता मौजे कुरंगी, ता. पाचोरा येथील गिरणा नदीपात्रात धडक कारवाई केली. या कारवाईत अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी एकूण २९ वाहने ताब्यात घेण्यात आली.


या कारवाईत हायवा, ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रॅक्टर तसेच उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या वाहने, यंत्रसामुग्री व वाळूसाठा असा एकत्रित सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेली सर्व वाहने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MAIDC) खत कारखाना येथील गोडाऊन परिसरात सुरक्षितरीत्या लावण्यात आली आहेत.


ही कारवाई उपविभागीय अधिकारी, पाचोरा भूषण अहिरे, तहसीलदार पाचोरा विजय बनसोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव व भडगाव, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा, निवासी नायब तहसीलदार विनोद कुमावत, मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, वैशाली पाटील, भरत नन्नावरे, प्रकाश डहाके, राहुल पवार यांच्यासह महसूल व पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली.


ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांबाबत नियमानुसार पंचनामा व इतर आवश्यक कार्यवाही सुरू असून, संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल तसेच इतर लागू कायद्यांनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.


गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी महसूल विभागामार्फत यापुढेही नियमित तपासणी व धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीशब्दांना पंख, कवितेला नवे आकाश! पुढील बातमी →शब्दांना पंख... कवितेला नवे आकाश!”

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)