संघटनेच्या बळाला नवी दिशा; धनगर समाज कर्मचारी संघटनेची बैठक उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी :
जळगाव जिल्हा धनगर समाज कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत कर्मचारी एकीकरण, संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी आणि समाजाच्या आगामी वाटचालीचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे अध्यक्षस्थान माजी केंद्रप्रमुख श्री. बन्सीलाल भागवत सर यांनी भूषविले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अहिल्यादेवींच्या कार्यातून समाजसेवा, न्याय, धैर्य आणि लोककल्याणाची प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यामध्ये जिल्हाध्यक्ष श्री. तुळशीराम सोनवणे, महिला जिल्हाध्यक्षा श्रीमती भारतीताई ठाकरे, जिल्हा सरचिटणीस श्री. अनिल मनोरे आणि कार्याध्यक्ष श्री. पांडुरंग पवार यांचा समावेश होता.
कर्मचारी गणना अभियान व सदस्य नोंदणीवर भरप्रास्ताविकात श्री. गोपाल हडपे सर यांनी धनगर समाजातील शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत कर्मचारी बांधवांची माहिती संकलित करण्यासाठी कर्मचारी गणना विशेष अभियान राबविण्याची गरज व्यक्त केली. तसेच तालुकानिहाय कर्मचारी संपर्क, सदस्य नोंदणी आणि संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
कर्तृत्ववानांचा गौरवबैठकीदरम्यान विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून समाजाचा गौरव वाढविणाऱ्या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये वसुंधराताई लांडगे यांची अमळनेर अर्बन बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी नियुक्ती, श्री. डी. ए. धनगर सर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, श्रीमती सुवर्णाताई धनगर यांना ए.एन.एम. प्रमोशनल एल.एच.व्ही. पॅरामेडिकल मुंबई परीक्षेत जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक, श्री. प्रमोद बाविस्कर यांची असिस्टंट डेपो मॅनेजरपदी नियुक्ती आणि श्री. बापूराव सांगोरे यांना क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त श्रीमती सोनालीताई धनगर व श्रीमती भारतीताई धनगर यांनी एस.टी. महामंडळ अमळनेर येथे ३०० उकडीच्या मोदकांचे वाटप केल्याबद्दल, श्री. अनिलदादा बागुल यांनी कुस्तीमध्ये पदक पटकावल्याबद्दल आणि श्री. निलेशदादा लांडगे, आदर्श व्यक्तिमत्व तथा संस्थाचालक, न्यू व्हिजन स्कूल इंग्लिश मीडियम अमळनेर, यांचाही सत्कार करण्यात आला.
“एकत्र आलो तर प्रश्नांना दिशा मिळेल”जिल्हाध्यक्ष श्री. तुळशीराम सोनवणे यांनी मनोगतात संघटनेच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. “आपण एकत्र आलो, तर प्रश्नांना दिशा मिळेल; आपण संघटित झालो, तर समाजाला नवी शक्ती मिळेल,” असा संघटनात्मक संदेश त्यांनी दिला.
नूतन कार्यकारणी सर्वांना सोबत घेऊन, ज्येष्ठांचे मार्गदर्शन स्वीकारून आणि संघटनेच्या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून काम करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पद हे केवळ जबाबदारीचे प्रतीक असून संघटित विचार, परस्पर सहकार्य आणि समाजहिताची भावना हीच संघटनेची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. तालुकानिहाय कर्मचारी संपर्क, सदस्य नोंदणी, कर्मचारी गणना अभियान, प्रश्नांचे संकलन आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मान्यवरांची मनोगतेवसुंधराताई लांडगे, श्री. डी. ए. धनगर सर, प्रा. विजय शिरसाट सर, श्री. श्रावण तेले सर, भारतीताई ठाकरे, श्री. अनिल मनोरे सर आणि श्री. उमेश मनोरे सर आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. बन्सीलाल भागवत सर यांनी संघटना बांधणीसाठी मार्गदर्शन केले. प्रत्येकाने संघटनेसाठी तसेच कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि समाजहिताची भावना जपावी, असे त्यांनी आवाहन केले.
नूतन पदाधिकाऱ्यांची जबाबदारी जाहीरधनगर समाज कर्मचारी संघटना जळगावच्या विविध पदांवर श्री. गोपाल हडपे – जिल्हा उपाध्यक्ष, श्री. आनंदा धनगर – जिल्हा संघटक आणि श्री. निरंजन पेंढारे – जिल्हा कोषाध्यक्ष यांची जबाबदारी देण्यात आली.
धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव प्रणित अमळनेर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्री. अनिल बागुल – तालुका अध्यक्ष, श्री. भूषण आत्माराम इधे – तालुका उपाध्यक्ष, श्री. दिलीप नामदेव खांडेकर – कोषाध्यक्ष, श्री. बापूराव संगोरे – सहकोषाध्यक्ष, श्री. राकेश पवार – कार्याध्यक्ष, श्री. मनोज मोर – प्रसिद्धी प्रमुख, श्री. चेतन देवरे – सचिव, श्री. मयूर धनगर – सहसचिव, श्री. प्रीतम रत्नपारखी – संघटक, श्री. प्रमोद बाविस्कर, श्री. गोपाल धनगर, श्री. खेमचंद साबे, श्री. मनोज रत्नपारखी व श्री. सोपान मोर – सहसंघटक यांची जबाबदारी देण्यात आली.
महिला कर्मचारी संघटनेच्या अमळनेर पदाधिकाऱ्यांमध्ये सौ. सुमित्रा मनोज रत्नपारखी – तालुका अध्यक्षा, सौ. शीतल उमेश मनोरे – उपाध्यक्षा, सौ. कविता शशिकांत आढावे – सचिव, सौ. सोनाली राजेंद्र धनगर – सहसचिव, सौ. भारती गोपाल धनगर, सौ. वैशाली देवीदास धनगर व सौ. कविता ठाकरे – सदस्या यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ए. बी. धनगर सर यांनी केले, तर आभार श्री. उमेश मनोरे सर यांनी मानले. बैठकीस धनगर समाजातील कर्मचारी, पदाधिकारी तसेच विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री तुळशीराम तोताराम सोनवणे (जिल्हाध्यक्ष)
धनगर समाज कर्मचारी संघटना जळगाव
ईश्वर रामदास महाजन
मुख्य संपादक

संबंधित बातम्या
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत...
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरण...
पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोध...
धरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 202...