Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

गणपतीचा प्रसाद ठरला शैक्षणिक मदतीचा आधार! नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

@ WEB TEAM 23 September 2026 1,132 views 0 comments 3 min read
🔧 साधने:
गणपतीचा प्रसाद ठरला शैक्षणिक मदतीचा आधार! नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयात गरजू विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप

जळगाव प्रतिनिधी :

गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधत जळगाव येथील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गणपतीचा प्रसाद म्हणून शालेय साहित्य देण्याच्या या अभिनव उपक्रमातून विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

विद्यालयात दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या गणपतीची स्थापना केली जाते. त्यानिमित्त कार्यालयाच्या वतीने एका दिवशी विद्यार्थिनींना विविध स्वरूपाचा प्रसाद दिला जातो. यंदा मात्र या परंपरेला सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाची जोड देत ‘प्रसाद म्हणून शालेय साहित्य’ देण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली.

गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य मिळावे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने आवश्यक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सुलभा मुरलीधर राणे, उपप्राचार्या सौ. सुजाता सुनील नेमाडे, श्री. प्रदीप वाणी, पर्यवेक्षिका सौ. भारती संजय राणे, श्री. विज्ञान सिताराम सैदाणे आणि कार्यालय प्रमुख श्री. संदीप डोलारे यांच्या शुभहस्ते विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी वरिष्ठ लिपिक श्री. सागर गाजरे, कनिष्ठ लिपिक श्री. सर्वेश चौधरी, सौ. कीर्ती कोल्हे आणि सौ. वैशाली चौधरी यांनी सहकार्य केले.

गणेशोत्सवातील प्रसादाला सामाजिक बांधिलकीची जोड देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘उत्सवातून आनंद आणि शिक्षणातून भविष्य’ असा सकारात्मक संदेश देण्यात आला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर पोलिसांचा रूट मार्च! , संवेदनशील भागांत पोलिसांची शक्तिप्रदर्शक उपस्थिती; ९ अधिकारी, ९५ अंमलदार, आरसीपी, स्ट्रायकिंग फोर्ससह ११८ होमगार्डचा सहभाग पुढील बातमी →ठोस निर्णयासाठी एक पाऊल मागे! , निवडणूक आचारसंहितेमुळे जुनी पेन्शनचे २८ सप्टेंबरचे धरणे आंदोलन तूर्तास स्थगित , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा निर्णय; आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करणार

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)