Marathi Live News — ताज्या घडामोडी29 Sep 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टोंजुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासनग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचालपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थितीराष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची बाजी अमळनेर तालुक्यात प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवडधरणगावचे श्री राहुल सुरेंद्र जैन यांना 'समाज रत्न सम्मान 2026' प्रदान...पाणलोट विकास 2.0 अंतर्गत देऊळगाव राजा तालुक्यात १४ LRA प्रशिक्षण बॅच उत्साहात संपन्नजीव ओतून केलेल्या कामातूनच मिळतो खरा आनंद — माजी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटीललोकस्वातंत्र्य ही पत्रकार आणि समाजासाठी सतत सक्रिय संघटना !* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ६१ व्या विचारमंथन मेळाव्यात मान्यवरांचे प्रतिपादन.* *अतिथी सन्मान,पुरस्कार व आय कार्ड वितरण,पसायदानामृत विमोचन,निरंतर शैक्षणिक साहित्य उपक्रमाचा आक्टों
महाराष्ट्र

शब्दांना चिंतनाची धार, वक्तृत्वाला सादरीकरणाची साथ! , “चिंतन, उच्चारण अन् सादरीकरण; वक्तृत्व यशाचे त्रिसूत्र!” — प्रा. वा. ना. आंधळे

पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेत शिरपूरच्या शिवानी मोर्याने पटकावला प्रथम क्रमांक
@ WEB TEAM 20 September 2026 731 views 0 comments 5 min read
🔧 साधने:
शब्दांना चिंतनाची धार, वक्तृत्वाला सादरीकरणाची साथ!   , “चिंतन, उच्चारण अन् सादरीकरण; वक्तृत्व यशाचे त्रिसूत्र!” — प्रा. वा. ना. आंधळे
थोडक्यातविचारांची खोली, शब्दांची ताकद आणि सादरीकरणाची प्रभावी शैली यांचा संगम साधणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला मिळालेली दाद त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरली.

शहादा प्रतिनिधी :

वक्तृत्व म्हणजे केवळ प्रभावी बोलण्याची कला नव्हे, तर विचारांना शब्दांची ताकद देत श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. विषयाचे सखोल चिंतन, सुस्पष्ट उच्चारण आणि साभिनय सादरीकरण या त्रिसूत्रीचा मेळ साधला, तर वक्तृत्वाला निश्चितच वेगळी उंची प्राप्त होते. स्पर्धेत कोणता क्रमांक मिळतो यापेक्षा आपल्या चिंतनातून स्वतःला आणि उपस्थितांना आनंद मिळतो का, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. हाच विचार विद्यार्थ्यांना सातत्याने यशाच्या दिशेने घेऊन जाईल, असे प्रतिपादन कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी केले.


पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ आणि श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन विभागीय पुरुषोत्तम वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात परीक्षक म्हणून ते बोलत होते.

पारितोषिक वितरण समारंभ नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण व आरोग्य सभापती सौ. जयश्रीबेन दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य डॉ. विश्वासराव पाटील, कार्याध्यक्ष डॉ. सुनील पवार, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पटेल यांच्यासह विविध विद्याशाखांचे प्राचार्य उपस्थित होते.


 शिवानी मोर्याची बाजी


या वक्तृत्व स्पर्धेत शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजची शिवानी रमेश मोर्या हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला.

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयाची (शहादा) फातिमा मोहम्मद रफीक इसानी हिने द्वितीय क्रमांक मिळविला, तर आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी (शिरपूर) येथील बेग नशराह मोहम्मद अली हिने तृतीय क्रमांक पटकावला.


याशिवाय एम. जे. कॉलेज, जळगावची ऐश्वर्या प्रल्हाद पाटील आणि विधी महाविद्यालय, नाशिकचा कल्पेश संजय माळी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला मिळाली दाद


स्पर्धेचे यशस्वी आयोजन मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील तसेच संचालक मंडळाने अभिनंदन केले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय प्रकाश शर्मा यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. चंद्रशेखर सुतार यांनी केले.


विचारांची खोली, शब्दांची ताकद आणि सादरीकरणाची प्रभावी शैली यांचा संगम साधणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला मिळालेली दाद त्यांच्या भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरली.


ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक

9860352960
← मागील बातमीअमळनेरात भाजपा शहर तर्फे गोशाळेत वृक्षारोपण पुढील बातमी →शेतकरी कुटुंबातील निरंजनची CBIमध्ये भरारी! , साने गुरुजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याची केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत ‘CBI सब-इन्स्पेक्टर’पदी अभिमानास्पद निवड

संबंधित बातम्या

कमेंट्स (0)